रिक्षात सापडलेले दागिने मिळाले

रिक्षात सापडलेले दागिने मिळाले
Published on

वाहतूक पोलिसाच्या तत्‍परतेमुळे
रिक्षात सापडलेले दागिने मिळाले
कांदिवली, ता. २ (बातमीदार)ः बोरिवली पश्चिमेला योगीनगर ते शिवाजीनगर दरम्यान रिक्षात प्रवास करताना साधना श्रीपाद खांडेकर या दागिन्यांची पिशवी रिक्षात विसरल्‍या होत्‍या. ही बाब लक्षात येताच त्‍यांचे नातेवाईक ऋग्वेद फडके यांनी तातडीने एम. एच. बी. पोलिस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. वाहतूक पोलिस राहुल जाधव यांनी रिक्षाचा शोध घेऊन एका तासात दागिन्यांची पिशवी नातेवाईकांच्या स्वाधीन केली. या विसरलेल्या बॅगमध्ये सोन्याचे मंगळसूत्र, कानातील रिंग आणि अन्य छोटे दागिने असा एकूण २ लाख २२ हजार रुपये किमतीचा ऐवज होता. या कामगिरीबद्दल राहुल जाधव यांचे खांडेकर कुटुंबीयांनी आभार मानले. ही दागिन्यांची बॅग फडके यांच्या स्वाधीन करण्यात आली. या वेळी एम.एच.बी. पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन शिंदे, पोजिस उपनिरीक्षक मंगेश किरपेकर आदी उपस्‍थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.