

ज्येष्ठ नागरिक सन्मान आवाहन
धारावी, ता. २ (बातमीदार) : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने १ ऑक्टोबर या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ/संस्था कृतज्ञता सन्मान’ सुरू करण्यात आले आहे. ३० जून ते २६ ऑगस्टदरम्यान पुरस्कारासाठी प्रस्ताव स्वीकारण्यात येत आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन ज्येष्ठ नागरिक संघ किंवा संस्था स्थापन करतात. आपल्या अनुभवाच्या जोरावर समाजाभिमुख कार्य करतात. या संघाचा किंवा संस्थेचा यथोचित मानसन्मान व्हावा, हा या पुरस्काराचा उद्देश आहे. या सन्मानाचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र आणि मानधन असे राहील. हा सन्मान सोहळा ६ ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्य सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पार पडेल. अधिक माहितीसाठी www.chavancentre.org या वेबसाईटवर संपर्क साधता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.