मुरबाड शहरात माकडांचा उच्छाद

मुरबाड शहरात माकडांचा उच्छाद

मुरबाड, ता. २ (बातमीदार) : शहरातील बाजारपेठेत असणाऱ्या हनुमान मंदिर परिसरात सध्या एका माकडाने उच्छाद मांडला आहे. हे माकड शेजारील इमारतींमध्ये जाऊन खाण्यापिण्याच्या वस्तू पळवून नेत आहे. तसेच रहिवाशांच्या अंगावर धावून जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. या माकडाने प्रभावती जाधव या महिलेवर हल्ला केल्याने महिलेचा रक्तदाब वाढला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याची माहिती आनंद दुगाडे यांनी दिली. माकडामुळे रहिवासी हैराण झाले असून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करत आहेत. याबाबत मुरबाड नगरपंचायत व वनविभाग कार्यालयात लेखी निवेदन देण्यात आले आहे; मात्र माकडाला पकडून जंगलात सोडून देण्यासाठी यंत्रणा हालचाल करत नसल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com