ईशान्य मुंबईतील समस्या मार्गी लावण्याची मागणी

ईशान्य मुंबईतील समस्या मार्गी लावण्याची मागणी
Published on

ईशान्य मुंबईतील समस्या मार्गी लावण्याची मागणी

मुलुंड, ता. २ (बातमीदार) : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक समस्या प्रलंबित असून विशेष करून डम्पिंग ग्राऊंड, पुनर्वसन प्रकल्प, वैद्यकीय सुविधांचाही यामध्ये समावेश आहे. या मतदारसंघाचे खासदार संजय दिना पाटील यांनी या समस्यांच्या पार्श्वभूमीवरच त्यांनी ही निवडणूक भरघोस मतांनी जिंकली आहे. त्यामुळे या समस्या मार्गी लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच खासदार पाटील यांनी या भागातील सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले होते.
या भागातील समस्यांवर खासदार संजय दिना पाटील यांच्याशी संपर्क साधण्यात आला, त्या वेळी त्यांनी सांगितले की, मतदारांनी जी आश्वासने दिली होती, ती मी पूर्ण करणार असून डम्पिंग ग्राऊंड कायमस्वरूपी बंद करण्यावर माझा भर असणार असल्याचेही सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com