मोहिते महाविद्यालयात नवीन कायद्यांचे मार्गदर्शन

मोहिते महाविद्यालयात नवीन कायद्यांचे मार्गदर्शन
Published on

मोहिते महाविद्यालयात नवीन कायद्यांचे मार्गदर्शन
मोखाडा, ता. २ (बातमीदार) : केंद्र सरकारने तीन नवीन कायद्यांमध्ये सुधारणा करून ते संमत केले आहेत. त्या कायद्यांची तातडीने अंमलबजावणी करण्यासही सुरुवात झाली आहे. या कायद्यांची महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, तसेच प्रसार व्हावा यासाठी मोखाडा पोलिसांनी मोहिते महाविद्यालयात मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्राला प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
भारत सरकार भारतीय दंड संहिता १८६० ऐवजी भारतीय न्याय संहिता २०२३, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ ऐवजी सुरक्षा संहिता २०२३ आणि पुरावा कायदा १८७२ ऐवजी भारतीय साक्ष अधिनियम २०२३ प्रमाणे या तिन्ही कायद्यात बदल केला आहे. हे तिन्ही कायदे १ जुलैपासून देशात लागू करण्यात आले आहेत.
या कायद्यांची माहिती देण्यासाठी पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी गणपत पिंगळे यांच्या आदेशान्वये व मोखाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप गीते, पोलिस उपनिरीक्षक विकास दरगुडे, पोलिस उपनिरीक्षक संजय भुसाळ यांनी खोडाळ्यातील मोहिते महाविद्यालयात मार्गदर्शन केले.

MUM२४E५७२४० नवीन कायद्यांचे विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मार्गदर्शन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com