विरार पालिका अधिकाऱ्यांना काळे फासणार

विरार पालिका अधिकाऱ्यांना काळे फासणार
Published on

विरार पालिका अधिकाऱ्यांना काळे फासणार
शिवसेनेचा इशारा, नागरी समस्यांकडे दुर्लक्ष
विरार, ता. २ (बातमीदार) : कृत्रिम पाणीटंचाई, अस्वच्छता आणि अन्य समस्यांनी विरार पूर्व परिसरातील रहिवासी त्रस्त आहेत. ही गंभीर बाब वसई-विरार महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली, तरीही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत या समस्या सोडवण्यात आल्या नाहीत, तर संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासणार असल्याचा इशारा शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) वसई तालुकाप्रमुख सुदेश चौधरी व ‘परिवर्तन संघटने’चे मयुरेश वाघ यांनी दिला आहे. या समस्यांबाबत सोमवारी (ता. १) आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेऊन परिसरातील समस्या त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.
विरारसह परिसरामध्ये कचरा, कृत्रिम पाणीटंचाई, निर्माण केली जाते, फेरीवाल्यांचा उपद्रव, भटक्या कुत्र्यांचा मोकाट वावर अशा अनेक समस्यांनी येथील नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे यासाठी पालिका प्रशासनाकडे कामांचा पाठपुरावा करण्यात आला; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या वेळी ‘आपला दवाखाना` सुरू करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी भक्ती चौधरी यांच्याकडून टाळाटाळ केली जात असल्याची तक्रारही करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे व संजय हेरवाडे यांना या नागरी समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र त्यानंतरही जर उपाययोजना झाल्या नाहीत, तर अधिकाऱ्यांना काळे फासणार असल्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.
MUM24E57241

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com