राज्यात स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवंडाना आरक्षण द्या

राज्यात स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवंडाना आरक्षण द्या

राज्यात स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवंडांना आरक्षण द्या
जव्हार, ता. २ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम जव्हार तालुक्यातील दिवंगत स्वातंत्र्य सैनिक सदाशिव दामोदर घोलप यांच्या पत्नी रेणुका घोलप यांनी महाराष्ट्र शासनाकडे स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवंडांना (पाल्यांना) वैद्यकीय उच्च शिक्षणामध्ये आरक्षण देण्याची मागणी केली आहे. एम. बी. बी. एस, बी. डी. एस आदी शिक्षण घेण्याकरिता आरक्षित जागा निर्माण करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे, तसेच त्यांनी मुख्य सचिव, उपमुख्यमंत्री, विधान परिषद अध्यक्ष, विरोधी पक्षनेते यांच्याकडेही निवेदन दिले आहे, मात्र त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.
स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय वैद्यकीय शिक्षणाची फी देण्यास असमर्थ असल्यामुळे उच्च शिक्षणापासून त्यांचे पाल्य वंचित राहत आहे. त्यामुळे २५ ऑगस्ट २००४ मध्ये शासनाने निर्णय घेऊन स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी व मुलांकरिता आरक्षण दिले होते, मात्र त्यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांचे शिक्षणाचे वय निघून गेल्याने त्याचा फायदा त्यांना झाला नाही. देशातील इतर राज्यांनी गोवा, आसाम, पाॅंडेचरी, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड या राज्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवंडांना आरक्षण दिले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवंडांना वैद्यकीय शिक्षणामध्ये आरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com