अटकेच्या धाकाने सहा लाखांचा गंडा

अटकेच्या धाकाने सहा लाखांचा गंडा
Published on

अटकेच्या धाकाने सहा लाखांचा गंडा
मुंबई, ता. २ ः तुम्ही मलेशियाला पाठवलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ आहेत, हे पार्सल दिल्ली विमानतळावर रोखण्यात आले आहेत, तुमच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाला आहे, असा धाक दाखवत पवईत राहणाऱ्या वृद्धास सहा लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी पवई पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हा नोंदवला.
२७ जूनला या वृद्धाला सुमित मिश्रा असे नाव आणि दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर नियुक्त सीमाशुल्क निरीक्षक असा हुद्दा सांगणाऱ्या व्यक्तीने संपर्क साधला. मलेशियाला पाठवलेल्या पार्सलमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले असून ते दिल्ली विमानतळावर रोखण्यात आले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा अपहार केल्‍याप्रकरणी तुमच्याविरोधात सीबीआयने गुन्हा नोंदवला आहे, अशी माहिती दिली. या माहितीने वृद्ध हादरला. या प्रकरणात अटक करू, अटक वॉरंट जारी झाले आहे, असे सांगत प्रकरण दाबण्यासाठी या वृद्धाकडून पैशांची मागणी होऊ लागली. बदनामी टाळण्यासाठी या वृद्धाने टप्प्याटप्प्याने सहा लाख रुपये पोलिस अशी ओळख सांगणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यांवर जमा केली. याबाबत परिचित व्यक्तींशी चर्चा केली तेव्हा आपण फसवले गेलो याची जाणीव तक्रारदार वृद्धाला झाली. त्याने सोमवारी संध्याकाळी याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com