पारपत्र घोटाळ्यात पुरावे हस्तगत

पारपत्र घोटाळ्यात पुरावे हस्तगत
Published on

मुंबई, ता. २ : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पारपत्र घोटाळ्याप्रकरणी ठिकठिकाणी घातलेल्या छाप्यांमध्ये मुंबईतील एका दलालाकडून तब्बल दीड कोटींची रोकड जप्त केली आहे. तसेच दलालाचे कार्यालय, निवासस्थानी दडवून ठेवलेल्या असंख्य नोंदी, आकडेमोड असलेल्या पाच रोजनिशी, महत्त्वाची कागदपत्रे आणि तांत्रिक पुरावेही हस्तगत केल्याची माहिती सीबीआय अधिकाऱ्याने दिली.
मुंबई विभागीय पारपत्र कार्यालयाच्या अखत्यारीत सेवा बजावणाऱ्या १४ अधिकाऱ्यांसह १८ खासगी दलालांविरोधात आर्थिक घोटाळाप्रकरणी सीबीआयने २९ जूनला गुन्हा नोंदवला होता. परळ आणि मालाड येथील पारपत्र सेवा केंद्रात नियुक्त अधिकारी बनावट कागदपत्रांआधारे पारपत्र जारी करण्यासाठी दलालांमार्फत व्यक्तीनुरूप पैशांची मागणी करत होते. या सेवा केंद्रांमध्ये झाडाझडती दरम्यान अधिकारी, दलालांनी मोठ्या प्रमाणावर पैसे स्वीकारल्याच्या नोंदी आढळल्या होत्या. त्यानंतर शहरात ३३ ठिकाणी छापे मारण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com