‘...लाडकी बहीण’ योजनेसाठी अंबरनाथमध्ये गर्दी

‘...लाडकी बहीण’ योजनेसाठी अंबरनाथमध्ये गर्दी

Published on

अंबरनाथ, ता. २ (बातमीदार) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक लागणारे दाखले आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयात लाभार्थ्यांची गर्दी झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘बहीण माझी लाडकी’ योजना राबवणार अशी घोषणा केली होती. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्याबाबत अध्यादेश काढण्यात आला. २१ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये या योजनेतून देण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अंबरनाथ शहरातील आणि परिसरातील महिलांनी तहसीलदार कार्यालयात उत्पनाचे आणि रहिवासी दाखले मिळवण्यासाठी सोमवारपासून गर्दी केली होती. काही महिलांनी घरून येतानाच जेवणाचे डबे आणले होते. मिळालेल्या अर्जाचे झेरॉक्स काढण्यासाठी दुकानांमध्येही गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. अंबरनाथ तालुक्यात १८ महा-ई सेवा केंद्रांवर याबाबत लागणारे अर्ज उपलब्ध आहेत. लाभार्थ्यांना विहित मुदतीत आवश्यक असणारे दाखले उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार प्रशांती माने यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.