प्रलंबित मागण्यांसाठी परिचारिकांचे धरणे आंदोलन

प्रलंबित मागण्यांसाठी परिचारिकांचे धरणे आंदोलन

Published on

प्रलंबित मागण्यांसाठी शासकीय परिचारिकांचे आंदोलन

मुंबादेवी, ता. २ (बातमीदार) : मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मंगळवार (ता. २)पासून राज्यातील परिचारिकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या संस्थापक कमल वायकोळे, अध्यक्ष इंदुमती थोरात आणि सरचिटणीस विशाल सोनार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे राज्यातील वैद्यकीय सेवा संकटात येणार आहे.
यावेळी सरचिटणीस विशाल सोनार यांनी आपल्या परिचारिकांच्या समस्या सांगताना काही मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. त्यामध्ये बक्षी समिती खंड दोनमध्ये परिचारिकांवर झालेला अन्याय दूर करणे, परिचर्या संवर्गातील सर्व रिक्त पदे पदोन्नतीने तत्काळ भरण्यात यावी, अन्यायकारक सेवा प्रवेश नियमांमध्ये (सार्वजनिक आरोग्य विभाग) सुधारणा करून सर्व रिक्त पदे पदोन्नतीने तातडीने भरावी, ग्रामीण रुग्णालय येथे परिसेविकापद पुनर्जीवित करून तत्काळ भरावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत, तसेच विद्यार्थी परिचारिकांच्या विद्या वेतनातही वाढ करावी, अशी मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.