संध्या पुरेचा यांना कालिदास सन्मान पुरस्कार

संध्या पुरेचा यांना कालिदास सन्मान पुरस्कार

Published on

संध्या पुरेचा यांना कालिदास सन्मान पुरस्कार

मुंबई, ता. २ : भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरेचा यांनी आपल्या कला कारकिर्दीत भरतनाट्यमच्या नर्तिका आणि विदुषी म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय लौकिक संपादन केला आहे. ज्येष्ठ शास्त्रीय नर्तक गुरू पार्वती कुमार यांच्या शिष्या असलेल्या पुरेचा यांनी भरत कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सच्या प्रमुख म्हणूनदेखील त्यांनी शास्त्रीय नृत्य प्रशिक्षणात आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे, तसेच अभिनय दर्पणवर नृत्य सादर करणाऱ्या त्या भारतातील एकमेव नृत्य विदुषी आहेत. त्याचबरोबर संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा म्हणून मंदिर महोत्सव कला प्रवाह युवा कलोत्सब गुरू शिष्य परंपरेसारखे त्यांनी उपक्रम सुरू ठेवले आहेत.
MUM24E57268

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.