कामगार कल्याण मंडळाचा ७१ वा वर्धापन दिन साजरा

कामगार कल्याण मंडळाचा ७१ वा वर्धापन दिन साजरा

Published on

कामगार कल्याण मंडळाचा ७१ वा वर्धापन दिन साजरा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन, अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे योगदान महत्त्वाचे आहे. मंडळाच्या माध्यमातून अनेक नामवंत कलाकार, साहित्यिक, खेळाडू नावारूपाला आले असून याचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रतिपादन कामगार कल्याण आयुक्त रवीराज इळवे यांनी केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (ता. १) हुतात्मा बाबू गेनू मुंबई कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
रवीराज इळवे म्हणाले की, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे हे माझगाव डॉक येथे कामगार म्हणून कामाला असताना मंडळाच्या कामगार क्रीडा भवनाच्या मैदानात हॉलीबॉल खेळण्यासाठी येत होते. एका सामान्य कामगारापासून कामगार मंत्री असा त्यांनी केलेल्या प्रवासात मंडळाचेदेखील योगदान आहे. याचबरोबर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, कामगार कवी अविनाश दौंड, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, अलका कुबल, निर्मिती सावंत, विशाखा सुभेदार, राष्ट्रीय मास्टर किताब विजेते प्रकाश केळकर (टेनिस), महेंद्र चिपळूणकर, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू सदानंद शेट्ये, जयराम शेट्ये, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या रक्षा महाराव, विजय कुवळे, अशा अनेकांना मंडळाच्या सुविधांचा लाभ झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी कामगार नेते दिलीप जगताप, कामगार विभागाचे सेवानिवृत्त उपसचिव दादासाहेब खताळ, इंटकचे माजी अध्यक्ष अनिल गणाचार्य, लेखक मनोहर धोत्रे, अविनाश दौंड, लेखक नाटककार अविनाश कोल्हे, रवी गुलगुले, रायफल शूटिंग प्रशिक्षक विश्वजित शिंदे, जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक अजित शिंदे, प्रदीप शिंदे, प्रकाश बाडकर, विजय सकरे, अभिनेत्री निलांबरी खामकर, गुणवंत कामगार संघटनेचे दिलीप खोंड, राम सारंग, संगीत प्रशिक्षक वसंत कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.