खोपटमध्ये धावत्या कारला आग

खोपटमध्ये धावत्या कारला आग

Published on

खोपटमध्ये धावत्या कारला आग
ठाणे, ता. २ (वार्ताहर) : खोपट एसटी डेपोजवळ रॉयल ट्रीट हॉटेलसमोर एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही; मात्र या आगीत कार जळून खाक झाली. कारचालक मोहम्मद शेख हेही कार घेऊन वर्तकनगर येथून बेलापूर येथे निघाले होते. या कारमध्ये चालकासह दोन जण प्रवास करीत होते. दरम्यान कारला आग लागल्याचे समजताच मोहम्मद शेख याने प्रसंगावधानाने कार थांबवून सहप्रवाशाला सुखरूप बाहेर काढताच कारने पूर्ण पेट घेतला. अवघ्या काही मिनिटांतच कार जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.