एसटी संघटना मागण्यांवर ठाम

एसटी संघटना मागण्यांवर ठाम

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. २ : विविध आर्थिक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत मंगळवारी एसटी महामंडळ प्रशासनासोबत समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी कर्मचारी संघटनांच्या मागण्यांबाबत सकारात्मक अहवाल राज्य सरकारला पाठवू, असे आश्वासन दिले आहे, परंतु मागण्या मान्य झाल्या नाही, तर क्रांतीदिनापासून राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने दिला आहे.      
प्रलंबित महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतनवाढीच्या दराचा फरक एकरकमी अदा करा, चार हजार ८४९ कोटींची उर्वरित रक्कम मूळ वेतनात अदा करा, मूळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार, अडीच हजारांऐवजी सरसकट पाच हजार द्या, अशा विविध मागण्यांसाठी एसटी महामंडळातील सर्व कर्मचारी संघटनांनी एकत्र येत कृती समिती स्थापन केली आहे. या समितीच्या वतीने ९ किंवा १० जुलै रोजी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी कर्मचारी कृती समिती आणि एसटी प्रशासनामध्ये दोन तास चर्चा झाली. या बैठकीत कॅशलेस योजना चालू करण्याबाबत प्रशासन सकारात्मक असून २/२०१७ च्या प्रकरणी बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने मूळ जागी बदल्या करण्याचे आदेश काढणार, शिस्त व आवेदन कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करणार, तसेच कोणत्याही कारणास्तव निलंबनाला आळा घालण्याचे एसटी प्रशासनाने मान्य केल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com