सोनसाखळी चोरांना अटक

सोनसाखळी चोरांना अटक

Published on

सोनसाखळी चोरांना अटक
दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश
नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : नेरूळ पोलिसांनी सोनसाखळी चोरणाऱ्या दोन सराईत लुटारूंना अटक केली आहे. सतीश ऊर्फ अजय रमेश तपासे (वय २०) व अभिषेक भीमसिंग नागरी (वय २१) अशी आरोपींची नावे असून या दोघांनी नेरूळ हद्दीत केलेले चार सोनसाखळी चोरी गुन्हे उघडकीस आले आहेत.
नेरूळ सेक्टर २०मध्ये राहणाऱ्या लिसी ख्रिस्टोफर (वय ६९) या गेल्या २६ जून रोजी सकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे सेक्टर २८मधील बालाजी टेकडी येथे फेरफटका मारण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी एकाने लिसी यांच्या पाठीमागून येत त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची दीड तोळ्याची सोन्याची चेन खेचत काही अंतरावर उभ्या असलेल्या त्याच्या दोन साथीदारांसह दुचाकीवरून पळ काढला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून नेरूळ पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन ढगे, नीलेश शेवाळे व त्यांच्या पथकाने या आरोपींचा शोध सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत आरोपींनी काही अंतरावर आपल्या अंगावरील कपडे व दुचाकी बदलल्याचे आढळून आले. मात्र, त्यानंतरदेखील पोलिसांनी या आरोपींचा माग काढून सतीश ऊर्फ अजय तपासे व अभिषेक नागरी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी जबरी चोरीचे इतर तीन गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या गुह्यातील दोन लाख किमतीचे सोन्याचे दागिने व गुह्यात वापरलेली दुचाकी जप्त करत तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.