

‘जन्म-मृत्यू’चा कारभार ठप्प
ठाणे पालिकेची गेल्या १५ दिवसांपासून सेवा बंद
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : पालिका क्षेत्रात जन्माला येणाऱ्या बालकांसह मृत्यू झालेल्यांच्या वारसांना महापालिकेच्या प्रभाग समितीनिहाय जन्म-मृत्यूचे दाखले देण्यात येत असतात. ऑनलाईन पद्धतीने हे दाखले दिले जात आहेत. मात्र, मागील १५ दिवसांपासून ही सेवा बंद असल्याची बाब समोर आली आहे. इंटरनेटची व्यवस्था सध्या अद्ययावत होत असल्याने ही सेवा बंद असल्याचा दावा पालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाने केला आहे. मात्र, यामुळे दाखल्याची आवश्यकता असलेल्यांना त्याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ठाणे महापालिका हद्दीत रोज शेकडो नव्या बालकांचा जन्म होत असतो. तसेच काहींचा मृत्यूदेखील होतो. जन्मानंतर कोणत्या ना कोणत्या कामांसाठी जन्म दाखला हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो. तसेच मृत्यूनंतर काही ठिकाणी तो सादर करावा लागत असल्याने तोदेखील महत्त्वाचा आहे. पालिका हद्दीत महिन्याला सुमारे २ हजारांच्या आसपास बालकांचा जन्म होत आहे; तर मृत्यूचे प्रमाण हेदेखील १ हजार १२००च्या आसपास आहे. जन्माबरोबर मृत्यूचे प्रमाणही काहीसे सारखेच या आकडेवारीतून दिसून येते. त्यातच जन्म आणि मृत्यूचे दाखल इतर नोंदीसाठी अत्यावश्यक असतात; परंतु महापालिका क्षेत्रात सर्वच प्रभाग समितीमधील कार्यालयात जन्म-मृत्यूचे दाखले देण्याची प्रक्रिया मागील सुमारे १५ दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे प्रभाग समितीमध्ये अनेक नागरिक हे दाखले काढण्यासाठी रोजच्या रोज ये-जा करीत आहेत; मात्र त्यांना दाखले मिळतांना दिसत नाहीत, काहींनी ‘सिस्टम बंद’ असल्याने सध्या दाखले काढून देता येऊ शकत नसल्याचे कारण दिले जात आहे. त्यामुळे ही सिस्टम केव्हा सुरू होणार, याची माहितीदेखील उपलब्ध होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
..
केंद्र सरकारकडे बोट
जन्म-मृत्यूचे दाखले मिळत नसल्याच्या संदर्भात महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाशी संपर्क साधला असता, केंद्राकडून सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टमचे अपग्रेडेशन सुरू आहे. तसेच नवीन सिस्टमचे ट्रेनिग देण्याचे कामही सुरू आहे. त्यामुळे ही सेवा मागील काही दिवसांपासून बंद असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, प्रत्यक्षात ही सेवा अपग्रेड होत असताना महापालिकेची इंटरनेट सेवा तेवढी अद्ययावत नसल्यानेच अपग्रेडेशनमध्ये काही अडचणी निर्माण होत असल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. त्यामुळे महापालिकेची सेवादेखील अपग्रेड होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.