पालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे

पालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे
विरार, ता. २ (बातमीदार) : वसई-विरार शहर महापालिकेत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांना महापालिका आस्थापनेवर कायम करणेबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, यासाठी गेल्यावर्षी ३ जुलै रोजी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी महापौर राजीव पाटील व आमदार क्षितीज हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्व कामगार संघटनांनी पालिकेवर मोर्चा काढला होता. तथापि सद्यस्थितीत अधिवेशन कालावधीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासनाची व नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपावर न जाता बुधवारी (ता. ३) काळ्या फिती लावून पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करून आपले दैनंदिन कामकाज करणार असल्याची माहिती समन्वयक हार्दिक राऊत यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com