पोलिसाच्या कानशिलात लगावली

पोलिसाच्या कानशिलात लगावली

पोलिसाच्या कानशिलात लगावली
अंधेरी, ता. ३ (बातमीदार) ः बार ॲण्ड रेस्ट्रॉरंटमधील हुक्का तपासणीला विरोध करून बारच्या व्यवस्‍थापकाने पोलिस शिपायाच्या कानशिलात लगावल्‍याची घटना रविवारी (ता. ३०)अंधेरीत घडली. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच जॉएल नॉरबट फर्नांडिस याला आंबोली पोलिसांनी अटक केली. त्याला अंधेरीतील स्‍थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही घटना अंधेरीतील विरा देसाई रोड, लिटील डोअर हॉटेल ॲण्ड बारमध्ये घडली. समाधान बापूराव पाटील हे कल्याणच्या मलंग रोड, नांदिवली परिसरात राहत असून आंबोली पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. रविवारी रात्री उशिरा अकरा वाजता आंबोली पोलिसांचे एक विशेष पथक या बारमध्ये गेले होते. हुक्का पार्लर सुरू आहे का, याची पोलिसांकडून तपासणी सुरू होती. कारवाईदरम्‍यान फर्नांडिसने सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून पोलिस शिपाई समाधान पाटील यांच्या कानशिलात लगावली. या प्रकारानंतर तिथे उपस्थित पोलिसांनी जॉएलला चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com