..............बुरशीजन्य संसर्ग विषयी जनजागृती............

..............बुरशीजन्य संसर्ग विषयी जनजागृती............

Published on

बुरशीजन्य संसर्गाविषयी जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी स्वच्छता कर्मचारी हे एक महत्त्वाचे स्तंभ आहे. देबब्रता ऑरो फाउंडेशन आणि द एस्थेटिक क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने वांद्रे न्यायालयाजवळ पालिका चौकी येथे बुरशीजन्य संसर्गाविषयी तपासणी शिबिर आणि मोफत औषध वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात बुरशीजन्य संसर्गासंबंधित जनजागृती सत्राने करण्यात आली. या सत्रात बुरशीजन्य संसर्गाशी संबंधित कारणे, परिणाम आणि प्रतिबंधात्मक पर्यायांवर प्रकाश टाकण्यात आला. एस्थेटिक क्लिनिकच्या त्वचारोगतज्‍ज्ञांनी ५३ पालिका सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. बुरशीजन्य संसर्गाचे निदान झालेल्‍या कर्मचाऱ्यांना त्वचारोगतज्‍ज्ञांचा सल्ला आणि मोफत औषध देण्यात आले. यावेळी शारीरिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मोफत औषधे, क्रीम्स आणि टॅब्लेट्स देण्यात आले. या औषधांच्या योग्य वापराबाबत तज्ज्ञांकडून सूचना देण्यात आल्याची माहिती डॉ. रिंकी कपूर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.