कशेडी घाटात गॅसचा टँकर ७० फूट दरीत कोसळला

कशेडी घाटात गॅसचा टँकर ७० फूट दरीत कोसळला

Published on

कशेडी घाटात गॅसचा टँकर ७० फूट दरीत कोसळला
चालक जखमी; जीवितहानी टळली

पोलादपूर, ता. ३ (बातमीदार) ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उरण ते लोटे नायट्रोजन गॅस वाहतूक करणारा टॅंकर कशेडी घाटात खचलेल्या रस्त्यावरून चढत असताना पिकअप न घेतल्याने पाठीमागे येऊन खोल दरीत कोसळला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोलादपूर तालुक्यातील भोगाव हद्दीत घडली.
चालक अफिझुर रेहमान (वय ५५) हा आपल्या ताब्यातील टॅंकर नायट्रोजन गॅस भरून उरण ते लोटे येथे घेऊन जात असताना कशेडी घाटात भोगाव गावच्या हद्दीत आला असता येथील खचलेल्या रस्त्यावर चढत असताना टॅंकरने पीकअप न घेतल्याने मागे येऊन थेट बॅरिकेड्स तोडून सुमारे ७० फूट दरीत कोसळला. या अपघातात अफिझुर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच कशेडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोलिस, पोलादपूर पोलिसांसह घटनास्थळी पोहचले. श्रीकाळभैरवनाथ रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर, १०८ रुग्णवाहिकेची संपूर्ण टीम, महाड नगर परिषद आणि महाड एमआयडीसी येथील अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. येथील तीन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. महामार्ग पोलिसांकडून दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.