डेटा चोरी प्रकरणी चौघांवर गुन्हा

डेटा चोरी प्रकरणी चौघांवर गुन्हा

Published on

डेटा चोरीप्रकरणी चौघांवर गुन्हा

मुंबई, ता. ३ : बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीची महत्त्वाची, संवेदनशील विदा (डेटा) चोरून प्रतिस्पर्धी कंपनीला विकल्याची तक्रार वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारदार कंपनीत काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार कंपनी शहरात गृह खरेदी, विक्री, भाडेतत्त्वावर मालमत्ता मिळवून देणे आदी व्यवहारांसाठी ग्राहकांना ऑनलाईन सेवा पुरवते. गृह खरेदी-विक्रीसाठी इच्छुक ग्राहकांचा डेटा मिळवण्यासाठी कंपनी वर्षाला सुमारे ८० लाख रुपये खर्च करते. या कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकाने मेमध्ये अचानक राजीनामा दिला. त्यासोबत त्याच्या दोन सहकाऱ्यांनीही पगार घेऊन नोकरी सोडली. तर अन्य एक कर्मचारी १५ मेपासून बेपत्ता होता. अचानक घडलेल्या या संशयास्पद घडामोडींमुळे कंपनीने चौकशी सुरू केली. विभागीय व्यवस्थापकाने प्रतिस्पर्धी कंपनीत नोकरी स्विकारल्याची बाब समोर आली. तसेच, नोकरी सोडून गेलेले कर्मचारी अन्य कर्मचाऱ्यांना भडकावून, लाच देण्याचा प्रयत्न करून ग्राहकांचा डेटा चोरी करण्यास सांगत होते. ही बाब समजताच कंपनीने आपल्या गुगल ड्राईव्हवर चाचपणी केली असता नोकरी सोडलेल्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांचा महत्त्वाचा, व्यावसायिकदृष्ट्या संवेदनशील डेटा ऑफलाईन डाऊनलोड करून चोरला आणि प्रतिस्पर्धी कंपनीला विकल्याची बाब उघड झाली. त्या जोरावरच प्रतिस्पर्धी कंपनी संबंधित विभागात उत्तम कामगिरी करू शकली. त्यामुळे तक्रारदार कंपनीला मोठे नुकसान झाले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.