मनसेतर्फे मोफत वह्यांचे वाटप

मनसेतर्फे मोफत वह्यांचे वाटप

Published on

मनसेतर्फे मोफत वह्यांचे वाटप
घाटकोपर, ता. ३ (बातमीदार) ः महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक १२९चे शाखाध्यक्ष अरविंद गीते यांच्या वतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. घाटकोपर पश्चिमेतील पारशीवाडी येथे विद्यार्थांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
...................
डॉक्टर दिन उत्साहात
मुलुंड (बातमीदार) ः एचसीजी कॅन्सर सेंटर मुंबई आणि एचसीजी आयसीएस खुबचंदानी कॅन्सर सेंटर, कुलाबा येथे राष्‍ट्रीय डॉक्‍टर दिन साजरा करण्यात आला. डॉक्टरांसाठी ‘करके बताओ डॉक्‍टर साहेब’ ही अनोखी मोहीम यावेळी राबवण्यात आली. एका फिटनेस चॅलेंजचे आयोजनदेखील केले होते. आमचे डॉक्‍टर हे रुग्‍णसेवेचा अविभाज्‍य भाग असून रुग्‍णांसाठी नेहमीच सज्‍ज असतात. त्‍यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्‍त करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते, असे हेल्थकेअर ग्लोबलचे जॉर्ज अलेक्स यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.