म्हाडा ८ जुलैला ऐकणार 
सामन्यांच्या समस्या

म्हाडा ८ जुलैला ऐकणार सामन्यांच्या समस्या

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : सर्वसामान्यांच्या म्हाडाशी संबंधित असलेल्या समस्या ८ जुलैला म्हाडा उपाध्यक्ष ऐकणार आहेत. त्यासाठी तब्बल दोन महिन्यांनंतर लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे लोकशाही दिनात आपली कैफियत मांडण्यास इच्छुक असलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबईकरांचे म्हाडाशी संबंधित प्रश्‍न, समस्या मार्गी लावण्यासाठी जानेवारीपासून म्हाडा उपाध्यक्षांच्या दालनात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. मात्र, लोकसभा, विधान परिषद निवडणूक आचारसंहितेमुळे या कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध आले होते. त्यामुळे आता पुन्हा म्हाडाने लोकशाही दिनाचे आयोजन करण्यास सुरुवात केली असून सोमवार, ८ जुलैला उपाध्यक्षांच्या उपस्थितीत लोकशाही दिन पार पडणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.