धारावीत खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त

धारावीत खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त

Published on

धारावीत खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त
धारावी, ता. ४ (बातमीदार) : यंदाचा पावसाळा उशिराने सुरू झाला तरी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे मुंबई महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. धारावीअंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. अनेक रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार खड्ड्यात अडकून पडण्याच्या घटना वाढत आहेत. धारावीतही मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने पावसाचे पाणी रस्त्यांवर साचून राहत आहे. धारावीतील अनेक मार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून वाहनधारकांना त्याचा त्रास होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.