जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

पालघर, ता. ४ (बातमीदार) : भारतीय हवामान विभागाद्वारे २०२१ पासून मॉन्सूनच्या प्रत्येक महिन्याचा अंदाज देण्यात येत आहे. त्यानुसार सोमवारी (ता. १) प्रसिद्ध केलेल्या हवामान अंदाजानुसार जुलैमध्ये देशात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातही सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विस्तारित श्रेणी हवामान अंदाजानुसारसुद्धा ४ व ११ जुलै आणि १२ ते १८ जुलैदरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवली आहे. जूनप्रमाणे जुलैमध्येही पालघर जिल्ह्यातील कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा कृषी हवामान केंद्राकडून देण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार महावेधच्या आकडेवारीनुसार पालघर जिल्ह्यात ३० जूनपर्यंत सरासरी ४११.९४ मिमी इतका पाऊस आहे, तर यावर्षी ३६७.२ मिमी १०.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे, तसेच पालघर तालुक्यात ४६७.७ मिमी इतकी सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे. मोखाडा तालुक्यात १६८.० मिमी इतका सर्वात कमी पाऊस झाला आहे. डहाणूत ३६७ मिमी, जव्हारमध्ये २१५.७ मिमी, तलासरी ३०६.०मिमी, वसई ३८१.३ मिमी, विक्रमगड ३५९.४ मिमी, वाडा ४०७.१ मिमी पाऊस झाला. जुलै महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भातलागवड, फळबाग लागवड व इतर खरीप पिकाच्या आंतर मशागतीची कामे पावसाचा अंदाज बघून करावीत, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com