रेल्वेत हरवलेल्या वस्तू मालकांच्या स्वाधीन

रेल्वेत हरवलेल्या वस्तू मालकांच्या स्वाधीन

Published on

रेल्वेत हरवलेल्या वस्तू मालकांच्या स्वाधीन
कर्मचाऱ्यांचा प्रामाणिक प्रयत्न, रोख रक्कम, लॅपटॉप, कागदपत्रांचा समावेश

ठाणे शहर, ता. ४ (बातमीदार) : रेल्वे प्रवास करताना ठाणे रेल्वे स्थानकात हरवलेल्या वस्तू प्रामाणिकपणे शोधून देण्याचे काम रेल्वे कर्मचाऱ्यांनी केले आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या काळात प्रवाशांच्या हरवलेल्या वस्तू त्यांच्या स्वाधीन करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप, महत्त्वाची कागदपत्रे यांचा समावेश होता. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हा कामामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
ठाणे स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. गर्दीमुळे गाडी पकडणे कठीण असते, अशावेळी चढताना अथवा उतरताना होणाऱ्या गडबडीच्या वेळी अनेकदा त्यांचे साहित्य गाडीत अथवा फलाटावर विसरले जाते. हे साहित्य पुन्हा मिळेल की, नाही याची शक्यता नसते, मात्र ठाणे स्थानकातील रेल्वे कर्मचाऱ्यांची सतर्कता आणि प्रामाणिकपणामुळे या वस्तू पुन्हा त्यांच्या मालकांना परत मिळाल्या आहेत. यंदाच्या वर्षातील जानेवारी ते जून या महिन्यात ८५ प्रवाशांना त्यांच्या वस्तू रेल्वेने परत केल्या आहेत.

साहित्य परत मिळतेच
ठाणे रेल्वे व्यवस्थापक केशव तावडे यांच्या कार्यालयात सामान गहाळ झाल्याची तक्रार केल्यानंतर साहित्य शोधून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात असल्याचे प्रवासी सांगतात आणि तसा अभिप्रायदेखील अनेकजण देऊन जातात.

कर्मचाऱ्यांची तत्परता
रेल्वे कर्मचाऱ्यांची तत्परता आणि काही वेळा प्रवाशांच्या सतर्कतेमुळे रेल्वेकडे जमा झाल्यावर त्या-त्या वस्तूंच्या खऱ्या मालकाचा शोध घेऊन आवश्यक त्या प्रक्रियेनंतर त्यांना ती सुपूर्द करण्याची महत्त्वाची जबाबदारी असते, मात्र हे काम रेल्वेतील स्थानक व्यवस्थापक, कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी प्रामाणिकपणे करतात.
- प्रवीण पाटील, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी.

MUM24E57441

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.