मुंबई नाशिक मार्गावरील अतिक्रमणावर कारवाई

मुंबई नाशिक मार्गावरील अतिक्रमणावर कारवाई

Published on

खर्डी, ता. ४ (बातमीदार) : तहसीलदार कोमल ठाकूर यांनी शहापूर तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गालगत असणाऱ्या ९६ हॉटेलांना अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकाम अवैध व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. याच अनुषंगाने मोखावणे व कसाराखुर्द गाव हद्दीतील दोन हॉटेलांवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यावरही कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.

अतिक्रमण केलेल्या हॉटेलमालकांना २९ जून रोजी नोटिसा दिल्या होत्या. त्यानंतर शहापूरच्या तहसीलदार कोमल ठाकूर यांचे पथक व कसारा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत कसाऱ्याजवळील हॉटेल साईमानस आणि हॉटेल साईकृपा यांचे रस्त्यालगत असलेले अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या मदतीने पाडले, तसेच अतिक्रमणादरम्यान अवैध दारू विक्री केल्याचे निदर्शनास आल्याने कसारा पोलिस ठाण्यात विक्री करणाऱ्या व मद्यसेवन करणाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बुधवारी (ता. ३) दुसऱ्या दिवशी हॉटेल कसारा गेट, हॉटेल ओरिझोन, हॉटेल स्टार कॅफे, हॉटेल सेवाय, हॉटेल ऑरेंज आणि शिरोळ येथील हॉटेल ड्रीम लँड या हॉटेलचे अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले. तहसीलदार आणि पोलिस प्रशासनाने केलेल्या कारवाईने अवैध हॉटेल व्यावसायिक, विनापरवाना दारू विक्रेते, बार चालकांचे धाबे दणाणले आहेत.

मुंबई-नासिक महामार्गावरील ९६ हॉटेलांना अतिक्रमण हटविण्यासंदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांच्यावर टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात येणार आहे, तसेच अतिक्रमण हटवण्यात येणार आहे.
- कोमल ठाकूर, तहसीलदार, शहापूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.