राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यशाळा

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यशाळा
Published on

कासा, ता. ४ (बातमीदार) : २६ जून ते २ जुलैदरम्यान साजरा झालेल्या राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहात अदाणी इलेक्ट्रिसिटीने सहभाग घेतला होता. त्यांच्या विशेष सुरक्षा पथकाने या सप्ताहात वेगवेगळ्या ठिकाणी ५५ कार्यशाळा; तसेच प्रबोधनपर शैक्षणिक कार्यक्रम घेतले. वीजपुरवठा कंपनीतर्फे विविध विभागांमध्ये आणि ५०० मेगावॉट वीजनिर्मिती क्षमतेच्या डहाणू औष्णिक ऊर्जा केंद्रात कार्यक्रम झाले. विजेची उपकरणे हाताळताना अपघात होऊ नयेत, हे त्यांचे उद्दिष्ट होते.
जनजागृती कार्यक्रमांमध्ये विविध प्रकारच्या समाजगटांचा सहभाग होता. यात सामान्य नागरिक, औद्योगिक कर्मचारी, व्यापारी, ग्राहक, शालेय विद्यार्थी, रुग्णालयातील कर्मचारी, बांधकाम कामगार; तसेच झोपडपट्टीतील रहिवासींना सहभागी होते. विजेची उपकरणे, तारा हाताळताना काय काळजी घ्यावी; तसेच सुरक्षाविषयक कोणती काळजी घ्यावी, याची तपशीलवार माहिती या वेळी देण्यात आली. त्यामुळे सहभागी झालेल्या व्यक्तींना अशा वेळी नेमके काय करावे; तसेच विजेसंदर्भातील संभाव्य धोके कसे टाळावे हे कळले.

उपकरणे हाताळणीबाबत प्रशिक्षण
राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहाचा हेतू अत्यंत महत्त्वाचा आहे. विजेची उपकरणे, वीज यंत्रणा यांच्या सुरक्षित वापराचे महत्त्व नागरिकांना सांगण्यात आले. या प्रशिक्षणामुळे त्यांना विजेचा धक्का बसणे किंवा आगी लागणे अशा अपघातांची संख्या कमी करता येईल. लोकांना विजेमुळे संभाव्य धोक्यांची माहिती देणे, तसेच ते टाळण्यासाठी कुठल्या सुरक्षाविषयक उपाययोजना, याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.