ऐतिहासिक क्षणांचे मुंबईकर साक्षीदार

ऐतिहासिक क्षणांचे मुंबईकर साक्षीदार

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः टी-२० वर्ल्ड कप जिंकून मुंबईत आलेल्या क्रिकेट संघाच्या कौतुकासाठी मुंबईकरांनी मरीन ड्राईव्हवर चांगलीच गर्दी केली. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंना बघण्यासाठी मुंबई तसेच उपनगरांतून तरुण, तरुणींसह ज्येष्ठ नागरिक दाखल झाले होते; तर हे ऐतिहासिक क्षण हृदयात साठवून ठेवण्यासाठी अनेकांनी सुट्टी घेतल्याने मुंबईतील रस्ते गर्दीने ओसंडून गेले होते.
गिरगावला राहणारे राजेश कवडे २०११ च्या विजय रॅलीत सहभागी झाले होते. तब्बल तेरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर टीम इंडियाने विश्वचषकावर आपले नाव कोरले. त्यामुळे संघाचे कौतुक करण्यासाठी राजेश मरीन ड्राईव्हवर आले होते. या गर्दीमुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्याचे राजेश यांनी सांगितले. दुसरीकडे काळाचौकी भागात राहणारे चेतन कदम खास सुट्टी काढून रॅली बघण्यासाठी आले आहेत. २०११ मध्ये बसमधून काढलेली मिरवणूक त्यांनी बघितली होती. ते क्षण मुलानेही अनुभवायला पाहिजे, यासाठी ते आले होते.
--------------------------------------
२००७ आणि २०११ च्या वर्डकल्पच्या विजयी रॅलीबद्दल आई-वडिलांकडून ऐकले होते. आता प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी येथे आलो आहे.
- युग जटाईया, क्रिकेटप्रेमी
-------------------------------
विश्वकप हरल्यानंतर खूप दुःख झाले होत; मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीमने टी-२० वर्ल्डकप जिंकून देशवासीयांना पुन्हा आनंद साजरा करण्याची संधी दिली. विजय रॅलीत सर्व मित्र मिळून सहभागी होताना ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झालो.
- अभिषेक गुप्ता, क्रिकेटप्रेमी
-----------------------------------------
आम्ही संपूर्ण वर्ल्डकपचे सामने टीव्हीवर बघितले. आपल्या हिरोंना प्रत्यक्ष बघण्यासाठी आणि विश्वविजेत्यांचे स्वागत करण्यासाठी आज कामाला दांडी मारून वानखेडे स्टेडिअमवर आलो आहे.
- पवन घोसावी, क्रिकेटप्रेमी
----------------------------------------
रोहित आणि विराट कोहलीचा मी मोठा चाहता आहे. या दोघांना एकत्र बघण्याची खूप इच्छा होती. सर्व मित्रांबरोबर मी आलो आहे. या विजयी शोभायात्रेत सहभागी होऊन ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार मला होता आले आहे, त्याचा आनंद आहे.
- सिद्धेश गिम्हवणेकर, क्रिकेटप्रेमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.