शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना अभिवादन

शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना अभिवादन

Published on

शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना अभिवादन

घाटकोपर, ता. ४ (बातमीदार) : शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचे नाव ऐकले की डोळ्यासमोर पावनखिंडीचा इतिहास उभा राहतो. अशा शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त घाटकोपर पूर्व येथील बाजीप्रभू मंडळाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे गुरुवारी (ता. ४) आयोजन करण्यात आले होते. घाटकोपर पूर्व येथील उभारण्यात आलेल्या शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करत हर हर महादेव अशा गर्जना देत त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी खिमजीभाई पटेल, रमेश पवार, घाटकोपर पूर्व विधानसभा संघटक अशोक वंडेकर, चंद्रकांत गायकवाड, प्रकाश केदारे, शरद शिंदे, दिनेश सावंत, मधुकर खेडेकर, जगदीश विचारे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.