महिन्याभरात २१ नवजात बालकांचा मृत्यू

महिन्याभरात २१ नवजात बालकांचा मृत्यू

Published on

महिन्याभरात २१ नवजात बालकांचा मृत्यू
कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील घटना

कळवा, ता. ५ (बातमीदार) : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात गेल्या महिन्यात तब्बल २१ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. गेल्या वर्षी याच रुग्णालयात २४ तासांच्या कालावधीत १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासाठी ठाणे महापालिका आपल्या अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांची तरतूद करते; मात्र गेल्या वर्षी २४ तासांच्या कालावधीत १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने हे रुग्णालय चर्चेत आले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दखल घेत रुग्णालय प्रशासनाची झाडाझडती घेत काही अधिकाऱ्यांवर कारवाईही केली; मात्र २१ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून त्याचा भार कळवा रुग्णालयावर येत आहे. या रुग्णालयात जूनमध्ये ठाणे व पालघर जिल्ह्यातील ५१२ महिला प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. त्यातील ९० महिलांची याच रुग्णालयात प्रसूतीपूर्व नोंदणी करण्यात आली होती. यामध्ये २९४ महिलांची सिझरिन प्रसूती करण्यात आली. त्यातच २१ मुलांचे वजन दीड किलोपेक्षा कमी होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

रुग्णालयाचे वैदकीय अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांनी सांगितले की, ‘‘या मृत्यूमागील वस्तुस्थिती लक्षात घेता खासगी रुग्णालयात या बालकांना वाचवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्यांना शेवटच्या क्षणी गंभीर अवस्थेत या रुग्णालयात आणण्यात आले होते. बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. जयेश पानोत यांनी सांगितले की, ‘‘संबंधित बहुतेक मुले अशी आहेत ज्यांना ‘गोल्डन मिनिट’, म्हणजे जन्मानंतर लगेचच त्यांना उपचार मिळाले नाहीत, अशी होती. या बालकांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यापर्यंत, मौल्यवान वेळ आधीच वाया गेला होता. परिणामी त्यांना वाचवण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या फारसे काही केले जाऊ शकत नव्हते.’’


...
ठाणे व पालघर जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती असलेल्या प्रसूतीसाठी महिला रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. ९० नवजात शिशूंचे वजन १ किलोपेक्षा कमी होते. २१ पैकी १९ बालके ही खासगी रुग्णालयातील उपचारानंतर या ठिकाणी शेवटच्या क्षणी दाखल करण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
- डॉ. राकेश बारोट, वैद्यकीय अधिष्ठाता, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.