निविदा प्रक्रियेत अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप

निविदा प्रक्रियेत अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप

Published on

मुंबई ः शालेय पोषण आहार देण्याचे काम मुंबई महापालिकेने विविध महिला बचत गटांना देण्याचे ठरवले असून त्यासाठी निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवल्या जात आहेत; मात्र निविदा प्रक्रियेतील हस्तक्षेप थांबवण्याची मागणी बचत गटांनी केली आहे.
शालेय पोषण आहार विभागात पूर्व शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांचा निविदा प्रक्रियेतील हस्तक्षेप वाढू लागला आहे. याबाबत बचत गटांनी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडे रीतसर लेखी तक्रारदेखील केली आहे. गरीब होतकरू महिला संस्था व बचतगट यांनी निविदा अर्ज भरले आहेत. मात्र, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. या संदर्भात बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका उपायुक्त चंदा जाधव यांची भेट घेतली. या संदर्भातील तक्रार माझ्याकडे प्राप्त झाली आहे. मात्र, कारवाई संदर्भातील तपशील नसल्याने सोमवारनंतरच आम्ही याबाबत माहिती देऊ, असे उपायुक्त जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.