चिमुरडीची अत्याचार करून निर्घृण हत्या

चिमुरडीची अत्याचार करून निर्घृण हत्या

Published on

चिमुरडीची अत्याचार करून निर्घृण हत्या
भिवंडी, ता. ५ (बातमीदार) : एकाने नऊ वर्षीय अल्पवयीन चिमुरडीला खाऊचे प्रलोभन दाखवत अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी फरार झालेल्या आरोपीला अटक केली आहे.

अभय यादव (वय ४२) असे आरोपीचे नाव आहे. पोलिस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पीडिता शांतीनगर परिसरातील एका दुमजली चाळीत कुटुंबासह राहत होती. गुरुवारी (ता. ५) या मुलीचे सर्व कुटुंबीय घराबाहेर असताना त्याच चाळीत राहणाऱ्या अभयने या चिमुरडीस खाऊचे प्रलोभन दाखवून तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर तिची हत्या केली. दरम्यान, कुटुंबीयांनी घरी परतल्यानंतर मुलीची शोधाशोध सुरू केली असता एका खोलीत पीडितेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून चिमुरडीचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता येथील शासकीय इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवला असून गुरुवारी रात्री पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला होता. काही तासांतच पोलिसांनी अभय यादव याला बेड्या ठोकल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.