रिक्षाचालकाचा तरूणाला ठार मारण्याचा कट

रिक्षाचालकाचा तरूणाला ठार मारण्याचा कट

रिक्षाचालकाचा तरुणाला ठार मारण्याचा कट
हल्लेखोर फरारी; पोलिसांकडून शोध

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ : दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी एका रिक्षाचालकाने ३२ वर्षीय अनिल सदाशिव मुजमळे याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. जखमीला वेळीच उपचार मिळाल्याने हल्ल्यातून अनिल मुजमळे हा बचावला असून हल्लेखोर अद्याप फरारी असून महात्मा फुले चौक पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेतील इंदिरानगरमध्ये राहणारा रिक्षाचालक रमेश ससाणे आणि अनिल मुजमळे यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता. त्याचा बदला घेण्याच्या ईर्षेने रिक्षाचालक रमेश याने बुधवारी रात्री अनिल याला रस्त्यावर गाठून त्याच्यावर धारदार शस्त्राने मानेवर वार केले. या हल्ल्यात अनिल गंभीर जखमी झाला असून हल्लेखोर रिक्षाचालक फरारी झाला आहे. त्यानंतर जखमीला परिसरातील रहिवाशांनी रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद पाटील करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com