आगामी विधानसभेसाठी पोलिस संघटनाही मैदानात

आगामी विधानसभेसाठी पोलिस संघटनाही मैदानात

Published on

आगामी विधानसभेसाठी पोलिस संघटनाही मैदानात
आझाद मैदानात धरणे, संजय पांडे यांनी दिला इशारा

मुंबादेवी, ता. ७ (बातमीदार) : महाराष्ट्र पोलिस दलातून निवृत्त झालेल्या राज्यभरातील पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (ता. ५) आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. याचदरम्यान संजय पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवृत्त पोलिसांना सरकारसमोर त्यांच्या मागण्यांसाठी हात पसरावे लागतात, हे अशोभनीय असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर टीका केली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही १५ उमेदवार राज्यात उभे करणार असल्याचे पांडे यांनी सांगितले. यावेळी निवृत्त झालेल्या पोलिसांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
राज्यातील सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवा लागू करावी, पोलिसांच्या अपत्यांना भरती प्रकियामध्ये वयोमर्यादा ३८ पर्यंत सवलत देऊन एका अपत्यास शिपाईपदावर भरती करून घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली, तसेच कार्यकारी दलातील, पोलिस दलातील पदोन्नती साखळी आहे, यामध्ये पोलिस शिपाईपदावर भारती झालेला उमेदवार उपनिरीक्षक या पदावरून निवृत्त होईल, मात्र हा निर्णय राज्य राखीव दलासाठी लागू नसल्याने तो निर्णय लागू करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या मागण्यांबरोबरच पोलिसांच्या सुट्यांचाही प्रश्न मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली. तसेच आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पोलिसांच्या मागण्यांसाठी कमीतकमी १५ उमेदवार आम्ही उभे करू. यामध्ये मुंबईतून पाच, तर महाराष्ट्रातून अन्य जिल्ह्यात १० असे मिळून १५ उमेदवार उभे करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
पोलिसांवर होणारे हल्ले आहेत, ते हल्ले शासनावर हल्ले असे गृहित धरून शासन द्रोही म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही संजय पांडे यांनी या आंदोलनदरम्यान केली आहे.

MUM24E57605

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.