कामराज नगरमधील एसआरए प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेला विकासक निलंबित

कामराज नगरमधील एसआरए प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेला विकासक निलंबित

Published on

एसआरए प्रकल्पातील विकासक निलंबित
घाटकोपर, ता. ६ (बातमीदार) ः घाटकोपर पूर्व कामराज नगर येथील एसआरएसाठी नियुक्त केलेल्या विकासकाने वेळेवर काम सुरू न केल्याने त्‍याला निलंबित करण्यात आले आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाबाबत स्थानिक रहिवाशांनी तक्रार केली होती. त्यानंतर एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आदेश काढले होते.
घाटकोपर पूर्व कामराज नगर, परिसरातील झोपडपट्ट्या २००५ मध्ये नीलम बॉम्बे फायनान्स विकासकाला एसआरए अंतर्गत विकसित करण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. या करारांतर्गत ओम साई सहकारी गृहनिर्माण संस्थेची १०४४ घरे, आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या २२५० झोपड्या, श्री प्रेरणा सहकारी गृहनिर्माण संस्था, नालंदा सहकारी गृहनिर्माण संस्था, आनंदवन सहकारी गृहनिर्माण संस्था यांचा करार झाला. मात्र २० वर्षांत केवळ ९०० झोपड्या, ओम साई गणेश सहकारी संस्थेची १०४४ घरे बांधण्यात आली, उर्वरित बांधकाम व पुनर्वसनाचे कामही सुरू झालेले नाही.
जागेचे मालक सीताराम गरोडिया यांच्या सांगण्यावरून विकासक नीलम फायनान्ससोबत ५ हजार लोकांचा करार करण्यात आला. २० वर्षांत केवळ ९०० घरांचे पुनर्वसन झाले, उर्वरित कामे सुरूच झाली नाहीत. याबाबत २०१० पासून एसआरएकडे सातत्‍याने तक्रारी येत होत्‍या.
याबाबत आम्‍ही शासनाकडे सातत्‍याने तक्रारी केल्‍या होत्‍या, अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक परमेश्‍वर कदम यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.