विकासकाकडून झाडाला लोखंडी रॉडचे कुंपण

विकासकाकडून झाडाला लोखंडी रॉडचे कुंपण

विकसकाकडून झाडाला लोखंडी रॉडचे कुंपण

मालाड, ता. ६ (बातमीदार) : मालवणी गेट क्रमांक सहा येथील खासगी विकसकाने झाडांना लोखंडी रॉड लावून संरक्षण भिंत उभारल्याने झाडांचे नुकसान होत आहे. मालवणीमधील एम. एस. स्टॅन बिल्ड टेक रिॲलिटी ९५ वेस्ट या कंपनीचे मागील काही वर्षांपासून बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी असलेल्या तीस ते पस्तीस वर्षांच्या जुन्या झाडाचे नुकसान करण्यासाठी लोखंडी रॉड व पत्र्याच्या भिंती उभ्या करून या झाडाला इजा पोहचवण्यात येत आहे. विकसकाकडून स्वतःच्या फायद्यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास केला जात असल्यामुळे सामाजिक संस्था, संघटनांकडून पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे लेखी तक्रार केली आहे. तसेच, पालिकेच्या पी उत्तर विभागातील उद्यान अधीक्षक आणि पालिका आयुक्त व पालकमंत्री उपगरे यांच्याकडे तक्रार नोंदवण्यात आल्या आहेत.
परवानगी दिली कोणी?
या विकसकाने काही दिवसांपूर्वी शहीद अब्दुल हमीद रस्त्यावर रात्री खोदकाम करून सेव्हरेजची लाईन टाकण्यात आली होती. तसेच, सध्या पावसाचे दिवस असताना या विकसकाला खोदाई करण्याची परवानगी कोणी दिली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. नियम धाब्यावर बसवून विकसकालाच विशेष मदत का करण्यात येत आहे, असा सवाल सामाजिक संघटनांनी प्रशासनाला केला आहे.

MUM24E57606

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com