नॅशनल पार्कमधील कर्मचाऱ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी

नॅशनल पार्कमधील कर्मचाऱ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी

Published on

नॅशनल पार्कमधील कर्मचाऱ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी

मालाड, ता. ६ (बातमीदार ) : अभिषेक सामाजिक संस्था व तारा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली येथील नॅशनल पार्क एनआयसी हॉलमधील कामगारांसाठी व आदिवासी बांधवांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
या आरोग्य शिबिरामध्ये मोफत डोळे तपासणी, मोफत चष्मे वाटप आणि मोफत डोळ्यांसाठी लागणाऱ्या औषधांचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे मोतिबिंदूचे ऑपरेशनदेखील मोफत करण्यात येत असल्याने यावेळी दीडशे नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. अभिषेक शैक्षणिक सामाजिक संस्थेकडून महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांसाठी मोफत आरोग्य शिबिरे राबवून त्यांच्यासाठी अनेक शस्त्रक्रिया मोफतपणे राबवण्यात आल्या आहेत.

MUM24E57607

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.