वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवले

वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवले
Published on

किन्हवली, ता. ६ (बातमीदार) : धसई वनक्षेत्रातील गेगाव येथे संरक्षित जमिनीवरील अतिक्रमण वनविभागाने जेसीबीच्या साह्याने हटवले. शहापूर वनविभाग कार्यक्षेत्राच्या धसई वनपरिक्षेत्रातील परिमंडळ अस्नोलीमधील गेगाव गावातील संरक्षित वन सर्व्हे क्रमांक ११९ वर स्थानिकांकडून पोल्ट्रीफॉर्म उभारण्यात आले होते. शहापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक सचिन रेपाळ, सहायक वनसंरक्षक भाग्यश्री पोले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. या कारवाईत धसई वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर, वनपरिक्षेत्र अधिकारी बी. व्ही. चंद्रात्रे, नारायण इंगळे, एन. एल. भांगरे, वसंत सांगळे, आर. एन. घोडविंदे, विजय चौधरी, उमाकांत आव्हाड, विद्या फर्डे, जीजा ठाकरे आदींनी सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.