ठाणे स्थानकात प्रवाशांची धावपळ

ठाणे स्थानकात प्रवाशांची धावपळ

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : ठाणे रेल्वेस्थानकात शनिवारी काही तांत्रिक कारणांमुळे सर्व इंडिकेटर अचानक बंद झाले. याबाबतची उद्‍घोषणा रेल्वेकडून केली जात होती. मात्र, लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची चांगलीच धावपळ उडाल्याचे दिसून आले.
सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी एक ठाणे स्थानकात दुपारी १२ च्या सुमारास सर्व फलाटांवरील इंडिकेटर अचानक बंद पडले होते. याबाबतची उद्‍घोषणा रेल्वेकडून केल्या जात होत्या. तसेच लवकरात लवकर सर्व इंडिकेटर पूर्ववत केले जातील, असेही सांगण्यात येत होते. पण या प्रकाराने कोणती लोकल कोणत्या फलाटावर येणार असल्याची माहिती प्रवाशांना मिळत नव्हती. त्यामुळे बराच वेळ प्रवाशांना रेल्वेच्या उद्‍घोषणांवर अवलंबून राहावे लागले होते. अखेर काही वेळानंतर स्थानकांतील सर्व इंडिकेटर पूर्ववत झाले.
----------------------------------------
गेल्या काही महिन्यांपासून स्थानकातील इंडिकेटर आणि सीसी टीव्ही कॅमेरे वारंवार बंद पडत आहेत. रेल्वे प्रशासनाला विचारणा केली तर तांत्रिक बिघाडाचे कारण दिले जाते, पण ठोस उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी महासंघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.