लोकलच्या धडकेत रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू

लोकलच्या धडकेत रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू

Published on

लोकलच्या धडकेत रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू

बदलापूर, ता. ६ (बातमीदार) : बदलापूर रेल्वेस्थानकात कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकलची रेल्वे कर्मचारी जनार्दन देशमुख (वय ५७) यांना धडक बसली. देशमुख यांना रुग्णालयात दाखल करत असतानाच त्यांचे दुपारी दोनच्या सुमारास निधन झाले. देशमुख हे कर्जत येथील रहिवासी असून, ते रेल्वेचे कायमस्वरूपी कर्मचारी होते.

१५ ते २० रेल्वे कर्मचाऱ्यांसोबत देशमुख हे शनिवारी सकाळी रुळावर आपले काम करत होते. त्यानंतर ते सहकाऱ्यांना व स्वतःसाठी चहा आणायला गेले. चहा घेऊन रुळातून चालत येत असताना पाठीमागून येणाऱ्या लोकलच्या जोरजोरात वाजणाऱ्या हॉर्नचा आवाज त्यांना आला. यावेळी समोरून येणाऱ्या लोकलचा अंदाज न आल्याने, घाबरलेल्या देशमुख यांनी जीव वाचवण्यासाठी लोकल खाली झोपले. यावेळी मोटरमनने तत्काळ ब्रेक दाबला, मात्र लोकलची गती कमी होईपर्यंत अर्धी लोकल त्यांच्या अंगावरून गेली होती. यामध्ये देशमुख यांना लोकलच्या खालील लोखंडी भागाची धडक बसल्याने त्यांच्या कंबरेला आणि डोक्याला जबर दुखापत झाली. यावेळी त्यांना लोकल खालून बाहेर काढून जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र ते गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कल्याण येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र या दरम्यान जनार्दन देशमुख यांचा मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.