पालिकेचे विक्रमी कचरा संकलन

पालिकेचे विक्रमी कचरा संकलन

Published on

मुंबई ः सखोल स्वच्छता मोहिमेत महापालिकेने शनिवारी एकाच दिवसात ९० मेट्रिक टन राडारोडा, २३ मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तू आणि ५५ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. तर २६८ किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ केले आहेत. मुंबई महानगरात गेल्या ३३ आठवड्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. संपूर्ण २२७ प्रभागांमध्ये ही मोहीम निरंतर सुरू आहे. शनिवारी सर्व प्रभागात लोकसहभागातून ही मोहीम राबवण्यात आली. मोहिमेत एक हजार ०२१ कामगार-कर्मचाऱ्यांनी १४४ संयंत्राच्या सहाय्याने ही कामगिरी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.