घाटकोपरमध्ये गटार तुंबल्याने दुर्गंधीचे साम्राज्य

घाटकोपरमध्ये गटार तुंबल्याने दुर्गंधीचे साम्राज्य

Published on

घाटकोपरमध्ये गटार तुंबल्याने दुर्गंधीचे साम्राज्य

घाटकोपर, ता. ७ (बातमीदार) : पावसाळ्यापूर्वी गटार, नाले शंभर टक्के साफ करण्यात आल्याचा दावा पालिकेकडून केला जातो, मात्र अद्यापही शहरातील छोटे-छोटे नाले, गटारे तासभर पडणाऱ्या पावसात तुंबत असल्याचे निदर्शनाला येत आहे. घाटकोपर पश्चिम, लाल बहादूर शास्त्री मार्गावरील गोपाळ भवन येथे गटार तुडुंब भरल्याने यामधील सांडपाणी रस्त्यावर येत आहे. गटातील सांडपाणी तुंबल्याने परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पश्चिम एलबीएस मार्ग, गोपाळ भवन येथील संभव सोसायटीजवळील असलेल्या रस्त्यावर गटार भरल्याने येथील सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्यांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. रहिवाशांनी काही दिवसांपूर्वी एन वार्डकडे तक्रार केली होती, त्यानंतर सफाई केली गेली. मात्र आता पुन्हा एकदा गटारे तुंबून दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि आजारी असणाऱ्या रुग्णांना या दुर्गंधीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे संभव सोसायटीतील रहिवाशी राम रिंगे आणि सतीश गोरे यांनी सांगितले.

MUM24E57669

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.