८० वर्ष जुन्या इमारतीचा भाग कोसळला

८० वर्ष जुन्या इमारतीचा भाग कोसळला

Published on

८० वर्षे जुन्या इमारतीचा भाग कोसळला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : जांभळीनाका बाजारपेठेतील ८० ते ९० वर्षे जुन्या इमारतीचा भाग रविवारी (ता. ७) कोसळला. जांभळीनाका येथील कडवा गल्ली परिसरात ८० ते ९० वर्षे जुनी अतिधोकादायक दुमजली इमारत आहे. या इमारतीत कोणीही वास्तव्याला नव्हते. रविवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास इमारतीचा जीर्ण झालेला भाग अचानक कोसळला. घटनेची माहिती ठाणे महापालिकेला मिळाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या कारणास्तव पथकांनी येथे धोकापट्टी बांधली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.