शहापूर विधानसभेवर ठाकरे गटाचा दावा

शहापूर विधानसभेवर ठाकरे गटाचा दावा

खर्डी/किन्हवली, ता. ७ (बातमीदार) : आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे शहापूर विधानसभेची जागा ठाकरे गटाला मिळावी. ही जागा ठाकरे गटाला न मिळाल्यास बंडखोर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येईल, असा इशारा तालुकाप्रमुख बाळा धानके यांनी शहापूर विधानसभा निवडणूक पूर्वतयारीसाठी आसनगाव येथील आयोजित मेळाव्यात दिला. त्या वेळी शेकडो शिवसैनिकांनी गर्दी केली होती.
आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. शहापूर तालुका ठाकरे गटाच्या वतीने शुक्रवारी (ता. ५) आसनगाव येथील पिताश्री लॉन्स सभागृहात भव्य मेळावा झाला. शहापुरातील शिवसैनिकांची मतमतांतरे, इच्छा, भावना व मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवण्यात येईल. मी ही जागा आपल्याला मिळावी, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी या वेळी मार्गदर्शन करताना जाहीर केले. जुने उमेदवार पक्षात न घेता निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी द्या. शिवसेनेला उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढण्याची शिवसैनिकांनी एकमुखी मागणी यावेळी केली.
भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख रूपेश म्हात्रे, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख केदार दिघे, विश्वास थळे, उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे, शहापूर तालुकाप्रमुख बाळा धानके, शहरप्रमुख विजय भगत, अल्पसंख्याक उपजिल्हाप्रमुख फारूक मेमन, रमेश जागे, रश्मी निमसे, गणेश राऊत, रंगनाथ कठोके, गुलाब भेरे, मंजुषा जाधव, दत्त ठाकरे, रवी लकडे उपस्थित होते.
--- -----
मोर्चेबांधणी सुरू
शहापूरच्या विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडे अविनाश शिंगे, विठ्ठल भगत, मंजुषा जाधव, जानू हिरवा, राजेंद्र म्हसकर, पद्माकर कैवारी, मनोज बागुल व ज्ञानेश्वर तळपाडे हे उमेदवार विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असून त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी योजना
लाडकी लेक योजनेऐवजी लाडकी भाची-भाचा योजना जाहीर करून दिल्यास बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध होईल. यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवे होते; पण निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन अनेक तांत्रिक अडचणी न सोडावता ही योजना महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहीर केल्याचा आरोप ज्योती ठाकरे यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com