वीज कामगारांच्या वेतनात वाढ

वीज कामगारांच्या वेतनात वाढ

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपन्यांमधील कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या मूळ वेतनात तब्बल १९ टक्क्यांची; तर भत्त्यांमध्ये २५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक मार्चपासून होणाऱ्या वेतनवाढीचा ६८ हजार ४५ कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.
वीज कामगारांच्या वेतन कराराची मुदत वर्षभरापूर्वी संपल्याने नवा वेतन करार करण्याबाबत वीज कंपन्यांचे व्यवस्थापन आणि महाराष्ट्र राज्य वीज कामगार, अभियंते, अधिकारी संयुक्त कृती समिती यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र, प्रशासन १५ टक्क्यांहून अधिकची वाढ देण्यास तयार नसल्याने कृती समितीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. याच अनुषंगाने झालेल्या बैठकीत मूळ वेतनात १९ टक्क्यांची; तर भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ करण्यावर एकमत झाल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी दिली.
------------------------------------------
अशी होणार पगारवाढ
नवीन वेतनवाढीनुसार तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना किमान ९ हजार रुपये, द्वितीय श्रेणीतील कर्मचारी-अधिकाऱ्यांना किमान ११ हजार रुपये तर प्रथम श्रेणीतील अधिकाऱ्यांना किमान २४ हजार रुपयांची वाढ होणार आहे. तसेच तीन वर्षांच्या कंत्राटी पद्धतीवर नेमलेल्या सहायक कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये वाढ करण्यात आली असून लाईनवर काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना अतिरिक्त एक हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.