आईसाठी लंडन ते ठाणे कारने प्रवास

आईसाठी लंडन ते ठाणे कारने प्रवास

Published on

आईसाठी लंडन ते ठाणे कारने प्रवास!
विराज मुंगळे यांनी सांगितले अनुभव; १६ देशांतील अनोखी सफर

धारावी, ता. ८ (बातमीदार) : जिद्द आणि आवड असली की कोणतीही गोष्ट अवघड नसते, अशीच कहाणी ठाण्यात पाहायला मिळाली. लंडनहून भारतात येण्यासाठी अनेक जण सहसा विमानाचा वापर करतात, मात्र भारतीय वंशाच्या एका ब्रिटिश नागरिकाने हा प्रवास रस्त्याने पूर्ण करून इतिहास रचला आहे. भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक विराज मुंगळे यांचा हा प्रवास सर्वांना अनुभवता यावा यासाठी धारावीतील मनोहर जोशी महाविद्यालयात नुकताच अनुभव कथनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांनी आयोजन केले होते. मुंगळे यांनी आपल्या आईसाठी अठरा हजार तीनशे किलोमीटरचा प्रवास एका कारमधून केला आहे. प्रवासाला लागले ५९ दिवस. १६ देश पार करत विराज मुंगळे आईला भेटण्यासाठी ठाण्यात पोहचले. ब्रिटनची राजधानी लंडन सातासमुद्रापलीकडे आहे. मात्र, एका ब्रिटिश नागरिकाने १८ हजार ३०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून इतिहास रचला आहे.
विराज मुंगळे यांनी लंडनहून निघाल्यानंतर सोळा देशांतून प्रवास करत ते भारतात पोहोचले. हा ५९ दिवसांचा प्रवास कसा होता. त्याचे कथन त्यांनी जोशी महाविद्यालयात केले.
आपल्या आईसाठी त्यांनी १६ देश फिरून ठाण्यात आईची भेट घेतली. ते इतरवेळी विमानाने येत असले तरी यावेळी त्यांनी कारने येण्याचा निर्णय घेतला. या दीर्घ प्रवासाला त्यांनी २० एप्रिल २०२४ रोजी लंडनहून सुरुवात केली होती. त्यानंतर ५९ दिवसांनी ते १७ जून रोजी ठाण्यात पोहचले. त्यांच्या या प्रवासात फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, पोलंड, लिथुआनिया, लॅटव्हिया, एस्टोनिया, रशिया, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, चीन, तिबेट आणि नेपाळमार्गे त्यांनी भारतात प्रवेश केला. या प्रवासात आलेले वेगवेगळे अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांसमोर कथन केले. यावेळी प्रमोद माने, मुख्याध्यापिका विना दोनवलकर, शाळेतील व महाविद्यालयातील शिक्षक आदी मान्यवर सहभागी झाले होते.

फोटो ओळ ः विराज आपले अनुभव कथन करताना.
UM24E57780

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.