मुलुंडमध्ये धारावीकरांचे पुनर्वसन नको!

मुलुंडमध्ये धारावीकरांचे पुनर्वसन नको!

मुलुंडमध्ये धारावीकरांचे पुनर्वसन नको!
मुंबई बचाव समितीची स्थापना
मुलुंड, ता. ९ (बातमीदार) ः धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये होणार असल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाल्‍यानंतर मुलुंडकर चांगलेच संतापले आहेत. विशेष म्हणजे सार्वजनिक उपक्रमांसाठी राखून ठेवलेल्या मुंबईतील सरकारी जमिनी एका खासगी कंपनीला देण्याचा डाव आखल्याचा आरोप मुलुंडचे सामाजिक कार्यकर्ते ॲड. सागर देवरे यांनी शनिवारी (ता. ६) मुलुंड येथील राजे संभाजी गृहामध्ये झालेल्या सभेमध्ये केला.
ॲड. सागर देवरे म्हणाले की, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली आधीच ५५० एकरच्या जमिनीचा कवडीमोलाने सौदा केला असून आता याच प्रकल्पाच्या नावाखाली मुंबईतील सुमारे दोन हजार एकर जागा एका अग्रगण्य खासगी व्यावसायिकाला देण्याचा घाट सरकारतर्फे सुरू आहे. आम्ही चार संघटनांनी एकत्र येऊन मुलुंडमध्ये धारावीसह मुंबई बचाव समिती स्थापन केली आहे. परिणामी केवळ धारावीपुरती मर्यादित असलेले हे आंदोलन आता आणखी तीव्र होणार असून ते मुंबईभर पसरण्याचे चित्र आहे, असे ते म्‍हणाले.
यावेळी माजी आमदार बाबूराव माने, ॲड. राजेंद्र कोरडे, ॲड. संदीप कटके, नसरुल हक, सुभाष पाखरे, जगन्नाथ खाडे, प्रयासचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते ॲड. सागर देवरे, अमोल गुप्ते, भरत सोनी, लोक चळवळीचे किरण पेहलवान, सामाजिक कार्यकर्ते संजय येवले उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांना भेटणार
सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्र्वभूमीवर मुंबई बचाव समितीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेणार आहे. त्यांना समितीच्या वतीने मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. या भेटीनंतर मुंबई बचाव समितीची पुढील रणनीती ठरणार आहे.

चार संघटना एकत्र
विशेष म्हणजे मुंबई बचाव समितीमध्ये धारावी बचाव समिती, लोक चळवळ, मुलुंड येथील प्रयास संघटना, विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. प्रत्येक संघटनेचे दोन प्रतिनिधी या समितीमध्ये असतील. लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने हे आंदोलन उभे करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com