पावसातही रस्त्यांची अवस्था दयनीय

पावसातही रस्त्यांची अवस्था दयनीय

Published on

धारावीतील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य
धारावी, ता. ११ (बातमीदार) : यंदाचा पावसाळा उशिरा सुरू झाला होता; मात्र त्याचा फायदा मुंबई पालिकेने घेतला नाही. पाऊसाला उशीर झाल्याने मुंबईतील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवायला प्राधान्य द्यायला पाहिजे होते, मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ राहिली. धारावीतील अंतर्गत रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असून अनेक रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे वाहनचालकांची कसरत चालली आहे. रस्त्यांची अवस्था दयनीय होऊनही पालिकेने यावर कोणताही तोडगा काढला नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
अनेक खड्ड्यातून पाणी साचल्यामुळे वाहने बंद पडण्याच्याही घटना घडत आहेत. साचलेल्या पाण्यातून जाताना खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे नागरिकांमधून पालिकेच्या कामावर संताप व्यक्त केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.